लॉकडाऊनच्या काळात अभिनेता सोनू सूद अनेक श्रमिकांच्या मदतीला धावून आला हजारो लोकांना त्याने घरी पोहचवल्यामुळे तो अनेक स्थलांतरीतांसाठी देवदूत ठरला.....प्रत्येकाला त्याच्या रुपात देव दिसला....त्याच्या ना कोणी जातीच होतं ना ओळखीच पण तो त्याच्यातल्या माणूसकीने त्याला स्वस्थ बसू दिल नाही आणि या श्रमिकांच्या मदतीसाठी दोन हात केले....लॉकडाऊनच्या काळात अनेक मजुरांच्या डोळ्यात आसवं होतं घरी कधी पोहचणार याची चिंता होती....मात्र त्यांची चिंता आणि आसवं हे दोन्ही सोनूने दूर केली....प्रत्येक श्रमिकाला घरी पोहचवण्यासाठी हा स्टारडम बाजूला सारून रस्त्यावर उतरला....कित्येक जण त्याला सांगत होते आ्म्हाला गावच्या वेशीपर्यंत पोहचव पण तो म्हणला मी तुम्हाला बॉर्डरवर नाही तर घरापर्यत पोहचवणार....खरंतर त्याचं हे मोठ मन पाहून अनेकांना गहिवरून आलं..त्याची ही आभाळमाया पाहून अनेकांनी त्याला मनापासून आशिर्वाद दिले....मीडियामध्येदेखील त्याच्या या चांगुलपणाची चर्चा झाली....बस, विमानं अशी सगळी काही व्यवस्था त्याने श्रमिकांना घरी पोहचवण्यासाठी केली.....श्रमिकांची संख्या जास्त होती मात्र सोनूचा ओघ हा अखंड अविरत दिवस रात्र सुरू होता....हे सारं काही थक्क करणारं होतं...त्याच्या याच सातत्यपूर्ण कार्याची दखल संयुक्त राष्ट्राने घेतली असून त्याचा सन्मान केला आहे. <br />#UN #Sonusood #SpecialHumanitarianActionAward #lokmatcnxfilmy #Cnxfilmy <br />आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!<br />सबस्क्राईब करायला क्लिक करा - <br />https://www.youtube.com/channel/UCC_aEK1jUpUPaa_N1aamvlA?view_as=subscriber